प्रवाशांनो लक्ष द्या : विदर्भ एक्सप्रेस नागपूरपर्यंतच धावणार !
भुसावळ (5 मे 2026) : सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्सप्रेसने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्वपूर्ण आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत गोंदिया स्थानकावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधा उन्नतीकरण कामांमुळे 3 ते 23 मे दरम्यान विदर्भ एक्सप्रेस नागपूर स्थानकापर्यंतच धावणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 12105 सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस मे ते 23 मे 2026 या कालावधीत नागपूर स्थानकावरच आंशिक समाप्त (शॉर्ट टर्मिनेट) होईल आणि गोंदियापर्यंत धावणार नाही.


गाडी क्रमांक 12106 गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस 3 मे ते 23 मे 2026 या कालावधीत गोंदियाऐवजी नागपूर स्थानकावरूनच सुटेल.
या कालावधीत दोन्ही दिशांमध्ये एकूण 21-21 फेर्यांवर परिणाम होईल. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाडीची अद्ययावत स्थिती तपासावी आणि त्यानुसार आपली प्रवास योजना आखावी, अशी विनंती आहे.
भारतीय रेल्वेला झालेल्या गैरसोयीबद्दल खेद आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नियमित सेवा तत्काळ सुरू करण्यात येतील, ज्यामुळे सुरक्षितता आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुधारेल, असेही रेल्वेने कळवले आहे.