प्रवाशांना मोठा दिलासा : काकीनाडा टाऊन-हिसार विशेष रेल्वे नियमित धावणार !
भुसावळ (5 मे 2026) : रेल्वेने काकीनाडा टाऊन आणि हिसार दरम्यान धावणार्या विशेष गाडी नियमित केल्या आहेत. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित गाड्या म्हणून चालवल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांची सोय वाढेल आणि कामकाज अधिक सुव्यवस्थित होईल. सध्या कार्यरत असलेल्या गाडी क्रमांक 07717/07718 काकीनाडा टाऊन ते हिसार साप्ताहिक विशेष गाड्यांचे खालीलप्रमाणे नियमित सेवांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.
नवीन क्रमांकानुसार धावणार गाड्या
गाडी क्रमांक 17295 काकीनाडा टाऊन ते हिसार साप्ताहिक एक्सप्रेस 12 मे पासून काकीनाडा टाऊन येथून धावणार आहे तर गाडी क्रमांक 17296 हिसार ते काकीनाडा टाऊन साप्ताहिक एक्सप्रेस 15 मे पासून धावणार आहे.


नियमित रेल्वे सेवांचा तपशील
गाडी क्रमांक 17295 साप्ताहिक एक्सप्रेस 12 मे पासून दर मंगळवार रोजी काकीनाडा टाऊन येथून 5.40 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी हिसार येथे 10.20 वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक 17296 साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 15 मे पासून दर शुक्रवारी हिसार येथून 2.10 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी काकीनाडा टाऊन येथे 9.35 वाजता पोहोचणार आहे.
या स्थानकावर गाडीला थांबा
या गाडीला काकिनाडा टाऊन, सामलकोट, राजमुंद्री, तादेपल्लीगुडम, एलुरु, विजयवाडा, गुटूर, मिरयालगुडा, नालगोंडा, चार्लापल्ली, मेडचल, कामारेड्डी, निझामाबाद, बासर, धर्माबाद, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मंदसोर, नीमच, चित्तौरगढ, भिलवारा, बिजेनगर, नासिराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा, रींगस जंक्शन, सिकर, नवलगढ़, झुनझुनू, चिड़ावा, लोहारू, सदूलपूर आणि हिसार स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
अशी आहे संरचना
दोन वातानुकूलित प्रथम, तीन वातानुकूलित द्वितीय, पाच वातानुकूलित तृतीय, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन असेल.