ग.स.सोसायटीच्या सभेत 15 मिनिटात 13 विषयांना मंजुरी

गोंधळाची परंपरा कायम ; दोघांचे सदस्यत्व रद्दचा ठराव मंजूर
जळगाव : गोंधळाची परंपरा कायम राखत ग.स.सोसायटीच्या सभेत अवघ्या 15 मिनिटात 13 विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी माजी संचालक रावसाहेब मांगो पाटील व योगेश सनेर या दोन जणांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव सत्ताधार्यांनी मंजूर केला. नूतन मराठा महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ग.स.ची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.
यांची होती सभेला उपस्थिती
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, विलास नेरकर, गटनेते तुकाराम बोरोले, अनिल पाटील, सुभाष जाधव सुनील पाटील, नथ्थू पाटील, सुनील पाटील, यशवंत सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, संजय पाटील, दिलीप चांगरे, संजय ठाकरे, सुभाष पाटील यांच्यासह सहकार गटाचे संचालक उदय पाटील, अजबसिंग पाटील, रागिणी चव्हाण, महेश पाटील, विद्यादेवी पाटील, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
