गुणवंतांनी राखली परंपरा : भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के


भुसावळ (8 मे 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही निकालाचा परंपरा कायम राखली. दहावी परीक्षेचा स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला.

या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
दहावी परीक्षेत पूर्वा किरण राणे (96.60%) गुण मिळवून प्रथम आली तर भारवी कृष्णकुमार ठाकुर (94.60 %) द्वितीय तर लावण्या ललित पाटील (94.40 %) तृतीय आली.



एस.सी प्रवर्गातून धनश्री हरेश ससाने ही मुलींमधुन 89.40% गुण मिळवून उत्तीर्ण झाली. 90 टक्क्यांवर नऊ विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले.

विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
एस.एस.सी परिक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे यांनी कौतुक केले. संस्थेचे सेंक्रेटरी पी.व्ही. पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !