दहावी परीक्षेत भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचा डंका
98.55 टक्के निकाल : भाग्यश्री व श्रृती चौधरी प्रथम तर लावण्या सूर्यवंशी द्वितीय
K. Narkhede Vidyalaya of Bhusawal Shines in the 10th Grade Examinations भुसावळ (8 मे 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयाने दहावी परीक्षेत उज्वल यशाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. विद्यालयाचा एकूण निकाल 98.55 टक्के लागला.
या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
प्रथम भाग्यश्री प्रशांत चौधरी व श्रृती धनंजय चौधरी (94.80 %),
व्दितीय- लावण्या विजय सूर्यवंशी (94.40 %), तृतीय- जान्हवी दगडू तायडे (93.60 %) आली. दरम्यान, विद्यार्थ्यांमधून प्रथम प्रथमेश मुकेश वानखेडे (93.40 %) तर विद्यार्थीनीमधून प्रथम भाग्यश्री प्रशांत चौधरी व श्रृती धनंजय चौधरी (94.80) आली तर मागासवर्गीयांमधुन प्रथम प्रथमेश मुकेश वानखेडे (93.40%) तर विद्यार्थिनींमधून प्रथम लावण्या विजय सूर्यवंशी ( 94.40%) आली.
विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
विद्यालयातून मार्च-2026 परीक्षेस एकूण 276 विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी 21 विद्यार्थ्यांनी शेकडा 90 टक्के व त्यापेक्षा जास्त़ गुण मिळवत यश मिळवले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर एन.नारखेडे, चेअरमन श्रीनिवास एन.नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, सदस्य डॉ.संजीव एन. नारखेडे, भाग्येश एम.नारखेडे, राज किशोर नारखेडे, ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, विकासपाचपांडे, के.एन.सी.टी.आय. विभाग प्रमुख बी.ए.पाटील, इतर संस्था सदस्य व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड. एस.ए.अडकमोल, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतूक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन एस.डी.वासकर यांनी केले.
