रेल्वे प्रवाशांना दिलासा : ओखा-तिरुपती विशेष गाडी नियमिज धावणार !


भुसावळ (10 मे 2026) : रेल्वेने ओखा आणि तिरुपती दरम्यान धावणार्‍या विशेष गाडी नियमित केल्या आहेत. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित गाड्या म्हणून चालवल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांची सोय वाढेल आणि कामकाज अधिक सुव्यवस्थित होईल. सध्या कार्यरत असलेल्या गाडी क्रमांक 09520/09519 ओखा ते तिरुपती साप्ताहिक विशेष गाड्यांचे खालीलप्रमाणे नियमित सेवांमध्ये रूपांतर केले जाईल:

गाडी क्रमांक 19560 ओखा ते तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस 11 मे पासून ओखा येथून तर गाडी क्रमांक 19559 तिरुपती ते ओखा साप्ताहिक एक्सप्रेस 14 मे पासून नियमित स्वरुपात धावणार आहे.



गाडी क्रमांक 19560 साप्ताहिक एक्सप्रेस 11 मे पासून दर सोमवार रोजी ओखा येथून रात्री 11.35 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी तिरुपती येथे 11.30 वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक 19559 साप्ताहिक एक्सप्रेस 14 मे पासून दर गुरुवारी तिरुपती येथून 8.15 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी ओखा येथे 11.50 वाजता पोहचेल.

या स्थानकावर थांबे
या गाडीला द्वारका, खंभालिया, जामनगर, हापा, राजकोट, वांकानेर, सुरेंद्रनगर, विरमगाम, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, उधना, नंदुरबार, अमलनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, बोलारम, काचीगुडा, महबूबनगर, गदवाल, कर्नूल सिटी, डोन, ताडिपत्री, कडप्पा, राजमपेटा आणि रेनिगुंटा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !