भुसावळात अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी


भुसावळ (14 मे 2026) : शहरात अकरावी प्रवेशासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी पार्ट-2 भरण्यास सुरुवात केली. शहरातील नामांकीत पुं.ओ.नाहाटा महाविद्यालयात सकाळपासूनच विद्यार्थी व पालकांची गर्दी पाहायला मिळाली.

बुधवारी ऑनलाईन साईट सुरू
गेल्या दोन दिवसांपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची साईट बंद असल्याने विद्यार्थी व पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. साईट केव्हा सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुधवारी साईट सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी घरून लॅपटॉप व संगणकाच्या माध्यमातून तर काहींनी कॅफेमधून पार्ट-2 भरला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !