यंग सायंटिस्ट परीक्षेत भुसावळच्या धन्वी चौधरीला राज्यात प्रथम रँक : अकादमी उत्कृष्टता पुरस्काराने झाला सन्मान
भुसावळ (15 मे 2026) : शहरातील डॉ.उल्हास पाटील शाळेची विद्यार्थिनी धन्वी गोपाळ चौधरी हिला नुकतेच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मान्यवरांच्या हस्ते अकादमी उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबईतील डॉ.होमी भाभा फाउंडेशनमार्फत घेण्यात आलेल्या यंग सायंटिस्ट परीक्षेत इयत्ता आठवीतून राज्यभरातील 24 हजार विद्यार्थ्यांमधून धन्वी ही राज्यात प्रथम रँकने उत्तीर्ण झाल्याने तिचा सन्मान करण्यात आला. तिला संस्थेमार्फत इस्रो भेटीसाठी सुद्धा नेण्यात येणार आहे.








