राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या : नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ
गणेश वाघ
Transfers of Senior Police Officers in the State: Pravin Padwal Appointed as Nashik IG भुसावळ (15 मे 2026) : राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी काढले आहेत. त्यात भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) व राज्य पोलीस सेवेतील अधिकार्यांचा समावेश आहे. खान्देशाचे लक्ष लागून असलेल्या नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षक (आय.जी.) पदी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदली आदेशानुसार अनेक अधिकार्यांना बढती देण्यात आली आहे.
चाळीसगावच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची पोलीस उपायुक्त बृहमुंबई येथे तर त्यांच्या जागी जळगावचे तत्कालीन अपर अधीक्षक अशोक नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.






अशा झाल्या अधिकार्यांच्या बदल्या
मनोजकुमार शर्मा मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत.
अनिल कुंभारे मुंबई गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त असतील.
सुवेझ हक यांची मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
मुंबईच्या वाहतूक सहपोलीस आयुक्तपदी सत्यनारायण चौधरी यांची बदली करण्यात आली आहे.
राजेश प्रधान हे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत.
कृष्ण प्रकाश यांच्यावर मोठी जबाबदारी
कृष्ण प्रकाश यांची प्रशिक्षण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.
लखमी गौतम यांची कायदा व सुव्यस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
परमजित दहिया यांची एटीएसच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या अधिकार्यांना पदोन्नती
नाशिक आयजी दत्तात्रय कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. आता प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. मुंबईतील डीसीपी प्रवीण मुंढे, कृष्कांत उपाध्याय आणि दीक्षित गेडाम यांना पदोन्नती देण्यात आली. मुंबईतच अपर पोलीस आयुक्त म्हणून घेणार तिन्ही अधिकारी पदभार स्वीकारतील.
तेजस्वी सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी
तेजस्वी सातपुते यांची पुण्याच्या गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली मात्र खरात प्रकरणातील एसआयटीचा तपास सातपुते यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोक्षदा पाटील यांची अपर पोलीस आयुक्त मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली. योगेश गुप्ता यांची गडचिरोलीच्या पोलीस उपमहानिरीक्षपदी बदली करण्यात आली आहे.
संजय दराडे पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त
जळगावचे तत्कालीरन अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी सीआयडीच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली.
राकेश ओला अमरावती पोलीस आयुक्त असतील तर संजय दराडे पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत.
सी.के.मीना कोकण परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील.
निशीथ मिश्रा यांची स्पेशल आयजी प्रशिक्षण येथे बदली करण्यात आली आहे.


