तोतया पोलिसांनी शेतकर्‍याची 60 हजारांची अंगठी लांबवली : मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकार


मुक्ताईनगर (18 मे 2026) : पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ शेतकर्‍याची तब्बल 60 हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली. मुक्ताईनगर तालुक्यात हा प्रकार घडला.

सुरेश रघुनाथ बोठे (69, रा. वढवे, ता.मुक्ताईनगर) हे रविवार, 17 मे 2026 रोजी बाजार करून मोटारसायकलने घरी परतत होते. त्या वेळी सालबर्डी गावाजवळ योगायोग हॉटेल परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून चौकशी सुरू असल्याचे भासवले.

संशय निर्माण करून आरोपींनी फिर्यादी यांच्या हातातील एक 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि दुसरी 4 ग्रॅम वजनाची पुष्पराज खडा असलेली सोन्याची अंगठी, एकूण 60 हजार रुपये िंकमतीच्या वस्तू घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तपास हवालदार राजेश चव्हाण करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !