हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान सुरू होणार्‍या साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या तांत्रिक कारणास्तव रद्द


भुसावळ (19 मे 2026) : हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान सुरू होणार्‍या विशेष व साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या पुढील आदेशापर्यंत पुढीलप्रमाणे रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

रेल्वे प्रशासनाने ऐनवेळी रद्द केल्या गाड्या
गाडी क्रमांक 07667 उद्घाटन विशेष गाडी 19 रोजीची गाडी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07813 विशेष एकेरी गाडी 20 मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.




गाडी क्रमांक 17667/17668 हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 17665/17666 हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !