अमरावती-सुरत एक्सप्रेस आता एलएचबी कोचसह धावणार !
रेल्वे प्रवाशांना अधिक आरामदायी व सुरक्षित प्रवास सुविधा
Amravati-Surat Express to now run with LHB coaches! भुसावळ (22 मे 2026) : रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अमरावती-सुरत एक्सप्रेसच्या (अप व डाउन दिशेतील) पारंपरिक आयसीएफ रेकऐवजी एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
असा होईल बदल
गाडी क्रमांक 20926 अमरावती-सुरत एक्सप्रेस अमरावती येथून 29 मे पासून एलएचबी कोचसह धावेल.



गाडी क्रमांक 20925 सुरत-अमरावती एक्सप्रेस सुरत येथून 28 मे पासून एलएचबी कोचसह धावणार आहे. या गाडीला एकूण 16 डबे असतील. त्यात एक वातानुकूलित चेअर कार, चार द्वितीय श्रेणी चेअर कार, दोन स्लीपर क्लास, सात सामान्य द्वितीय श्रेणी डबे, एक लगेजसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.
प्रवास होणार अधिक आरामदायी
एलएचबी कोच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुकर प्रवासाचा अनुभव देतात. या कोचमध्ये उत्तम सस्पेन्शन, अधिक स्थिरता तसेच प्रगत सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत.







