पोलिसांच्या डायल 112 वर विनाकारण कॉल ; संशयीताला न्यायालयाने सुनावली शिक्षा


Unnecessary Calls to Police ‘Dial 112’ ; Court Sentences Suspect धडगाव (22 मे 2026) : डायल 112 आपत्कालीन सेवेला विनाकारण कॉल करून पोलिसांची दिशाभूल करणार्‍या व्यक्तीविरोधात धडगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर संबंधितास न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली. विनाकारण यंत्रणेला वेठीण धरणार्‍यांना या कारवाईने आता चपराक बसणार आहे.

काय घडले धडगावात ?
धडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पो.कॉ./प्रीहवक सुनिल पिंपरे हे 28 एप्रिल 2022 रोजी डायल 112 बिट मार्शल-2 वर ड्युटीवर असताना सायंकाळी 5.45 वाजता जिल्हा परिषद कात्री शाळेजवळ भाऊ त्रास देत असून शिवीगाळ करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.




घटनास्थळी पोहोचल्यावर एक इसम सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून शांततेचा भंग करताना आढळून आला. चौकशीदरम्यान त्याने स्वतःचे नाव नारसिंग बोंडा पराडके (32, रा. गौर्‍याचा कामोदपाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे सांगितले. त्यानेच डायल 112 वर कॉल केल्याची कबुली दिली मात्र पोलिसांनी तपास केला असता कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असून विनाकारण पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने कॉल केल्याचे निदर्शनास आले.

वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अहवालानुसार संबंधिताने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध धडगाव पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

या प्रकरणात मा. न्यायालयाने संबंधित आरोपीस शिक्षा सुनावत डायल 112 सारख्या आपत्कालीन सेवांचा गैरवापर करू नये, असा स्पष्ट संदेश दिला आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !