देशवासीयांना पुन्हा इंधनदरवाढीचे चटके : नऊ दिवसांत तिसर्‍यांदा वाढले दर

मध्य पूर्व संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ : पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागले


नवी दिल्ली (23 मे 2026) : नऊ दिवसांत तिसर्‍यांदा इंधन दर वाढल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने आपसुकच महागाईत जनता आणखीन होरपळणार आहे. दिल्लीत पेट्रोल 87 पैशांनी महाग होऊन 99.51 प्रति लिटर झाले आहे. डिझेल 91 पैशांनी प्रति लिटर महाग झाले आहे. त्याचे दर 92.49 वर पोहोचले आहेत.

9 दिवसांत तिसर्‍यांदा वाढले दर
गेल्या 9 दिवसांतील इंधनाच्या दरातील ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी याच आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 90 पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली होती. तर, त्यापूर्वी काही दिवसांपूर्वीही दरात 3 रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली होती.





इंधनाच्या दरात वाढ झाल्याने ट्रक आणि टेम्पोचे भाडे वाढेल ज्यामुळे इतर राज्यांतून येणार्‍या भाज्या, फळे आणि रेशन महाग होतील.

ट्रॅक्टर आणि पंपिंग सेट चालवण्यासाठी शेतकर्‍यांना जास्त खर्च करावा लागेल, त्यामुळे धान्याचा खर्च वाढेल.

सार्वजनिक वाहतूक आणि स्कूल बसच्या भाड्यातही वाढ दिसून येऊ शकते.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ का झाली?
या वाढीचे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आहे. इराण आणि अमेरिकेचे युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर होते जे आता वाढून 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे तेल कंपन्या दबावाखाली होत्या. त्यामुळे कंपन्यांनी तोट्याची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जर कच्च्या तेलाच्या किमतीत दीर्घकाळ वाढ कायम राहिली तर पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढवल्या जाऊ शकतात.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !