यावल तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी हरिपुरा गावात वादळात अनेक वृक्ष कोसळली : शेती पिकांचे किरकोळ नुकसान
यावल (25 मे 2026) : यावल तालुक्यात रविवारी सायंकाळी हलका पाऊस झाला. यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा या गावात वादळ आले होते. या वादळामध्ये अनेक वृक्ष कोसळले तसेच त्या भागातील शेती पिकाची देखील किरकोळ नुकसान झालेले आहे.आश्रम शाळेसमोर तीन वृक्ष कोसळली यात सुदैवाने कुणालाचे काही दुखापत झाली नाही.
पिकांचे किरकोळ नुकसान
यावल शहर व तालुक्यात रविवारी सायंकाळी हलके वादळ आणि पाऊस झाला तर हरिपुरा, ता.यावल या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात वादळी वारा प्रचंड वेगाने वाहत होता. यामध्ये अॅड.नितीन कोळी, हिरालाल कोळी यांच्या घरासमोर आश्रम शाळेच्या गेट जवळ असलेली तीन झाडे कोसळली.








