प्रवाशांना मोठा दिलासा : पनवेल-सुभेदारगंजदरम्यान तीन अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या
प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय ; भुसावळसह प्रमुख स्थानकांवर थांबा
Major Relief for Passengers: Three Additional Summer Special Trains Between Panvel and Subedarganj भुसावळ (26 मे 2026) : उन्हाळ्याच्या हंगामात वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पनवेल आणि सुभेदारगंज दरम्यान 3 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे उत्तर भारताकडे जाणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक 04104 पनवेल-सुभेदारगंज साप्ताहिक विशेष गाडी गुरुवार, 21 मे आणि 28 मे 2026 रोजी पनवेल येथून दुपारी 3:20 वाजता सुटणार असून दुसर्या दिवशी सायंकाळी 6 वाजता सुभेदारगंज येथे पोहोचणार आहे. या गाडीच्या दोन फेर्या होणार आहेत.
गाडी क्रमांक 04103 सुभेदारगंज-पनवेल साप्ताहिक विशेष गाडी बुधवार, 27 मे 2026 रोजी दुपारी 2:40 वाजता सुभेदारगंज येथून सुटून दुसर्या दिवशी दुपारी 2.20 वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. या गाडीची एक फेरी होणार आहे.
या विशेष गाड्यांना कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर जंक्शन येथे थांबा देण्यात आला आहे.
गाडीमध्ये 1 वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 8 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी डबे, 1 सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅनचा समावेश करण्यात आला आहे.

