श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त उरुळी स्थानकावर 16 गाड्यांना तात्पुरता थांबा
भुसावळ (27 मे 2026) : जून 2026 मध्ये उरुळी येथे होणार्या श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवात सहभागी होणार्या भाविकांच्या प्रवासाची सोय होण्यासाठी मध्य रेल्वेने उरुळी स्थानकावर 16 गाड्यांना एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महोत्सवाचा मुख्य दिवस 2 जून 2026 रोजी आहे.
या गाड्यांना मिळाला थांबा
गाडी क्रमांक 12779 वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस उरुळी येथे पाच वाजता पोहोचेल. ही सुविधा 27 मे 2026 ते 5 जूल 2026 या कालावधीत उपलब्ध राहील.
गाडी क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस उरुळी येथे 4.15 वाजता पोहोचेल. ही सुविधा 27 मे 2026 ते 5 जून 2026 या कालावधीत उपलब्ध राहील.
गाडी क्रमांक 12781 म्हैसूर-हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्सप्रेस उरुळी येथे 4.30 वाजता आगमन 6 जून 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 12782 हजरत निजामुद्दीन-म्हैसूर स्वर्ण जयंती एक्सप्रेस उरुळी येथे 5.30 वाजता 2 जून 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 22685 यशवंतपूर-चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस उरुळी येथे 9.30 वाजता दिनांक 4 व 7 जून 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 22686 चंदीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस उरुळी येथे 10.22 वाजता 31 मे 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 12629 यशवंतपूर- हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेस उरुळी येथे 9.30 वाजता 3 जून 2026 आणि 5 जून 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 12630 हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस उरुळी येथे 10.20 वाजता 28 मे 2026 आणि 30 मे.2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 12147 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस उरुळी येथे 4.30 वाजता 2 जून 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 12148 हजरत निजामुद्दीन-श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर एक्सप्रेस उरुळी येथे 05.30 वाजता 29 मे 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 15030 पुणे-गोरखपूर एक्सप्रेस उरुळी येथे 11.40 वाजता 06 जून 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 15029 गोरखपूर-पुणे एक्सप्रेस उरुळी येथे रात्री 1.15 वाजता 29 मे 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 12104 लखनऊ जंक्शन-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस उरुळी येथे 5.04 वाजता 28 मे 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 11407 पुणे-लखनऊ जंक्शन एक्सप्रेस उरुळी येथे 10.15 वाजता 2 जून 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 11408 लखनऊ जंक्शन-पुणे एक्सप्रेस उरुळी येथे 10 वाजता 29 मे 2026 रोजी पोहोचेल.
गाडी क्रमांक 12129 पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस उरुळी येथे 6.50 वाजता 3 जून 2026 रोजी पोहोचेल.
याव्यतिरिक्त, मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 2 ते 4 जूनदरम्यान रुळी येथे उघडण्यात येणार्या गाडी क्रमांक 11077 पुणे-जम्मू तवी झेलम एक्सप्रेसमध्ये एक सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डबा देखील राखीव ठेवणार आहे.
प्रवाशांनी तात्पुरत्या थांब्यांची नोंद घ्यावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

