प्रवाशांना दिलासा : हुबळी-योग नगरी ऋषिकेश विशेष रेल्वेगाडी नियमित धावणार


भुसावळ (27 मे 2026) : रेल्वे प्रशासनाने हुबळी आणि योग नगरी ऋषिकेश दरम्यान धावणार्‍या विशेष रेल्वेगाडीचे नियमित रेल्वे सेवेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित एक्सप्रेस गाड्या म्हणून चालविण्यात येतील, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, विश्वासार्ह आणि नियमित सेवा उपलब्ध होईल. सध्या चालू असलेली गाडी क्रमांक 07363/07364 हुबळी – योग नगरी ऋषिकेश विशेष रेल्वेगाडीचे खालीलप्रमाणे नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे –

गाडी क्रमांक 17363 हुबळी – योग नगरी ऋषिकेश एक्सप्रेस (साप्ताहिक) दिनांक 6 जुलै 2026 पासून प्रत्येक सोमवारी हुबळी येथून सुटेल

गाडी क्रमांक 17364 योग नगरी ऋषिकेश -हुबळी एक्सप्रेस (साप्ताहिक) दिनांक 9 जुलै 2026 पासून प्रत्येक गुरुवारी योग नगरी ऋषिकेश येथून सुटेल.

नियमित रेल्वे सेवांचे वेळापत्रक
गाडी क्रमांक 17363 साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 6 जुलै 2026 पासून प्रत्येक सोमवारी हुबळी येथून 19.45 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी योग नगरी ऋषिकेश येथे 11.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 17364 साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 9 जुलै 2026 पासून प्रत्येक गुरुवारी योग नगरी ऋषिकेश येथून 06.15 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी हुबळी येथे 06.30 वाजता पोहोचेल.

या गाडीला धारवाड, लोंडा, बेळगाव, घाटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, मेरठ सिटी, मुजफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुडकी आणि हरिद्वार स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !