भुसावळात आयुध निर्माणी कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून केले कामकाज
प्रलंबित प्रमोशनची मागणी दुर्लक्षित होत असल्याने संताप
Ordnance Factory employees in Bhusawal worked wearing black armbands भुसावळ (1 जून 2026) : भुसावळ आयुध निर्माणीत अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या आदेशानुसार प्रलंबीत प्रमोशनच्या मागणीसाठी शुक्रवार, 29 रोजी कर्मचार्यांनी काळा दिवस पाळला. कामगार विरोधी धोरणांविरोधात कामगारांनी तिव्र विरोध दर्शवून काळ्या फिती लावून कामकाज केले.
भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या आदेशानुसार युनियनचे महासचिव दिनेश राजगिरे यांच्या मार्गदर्शनात भुसावळ ऑ. फॅक्टरी कामगार युनियनतर्फे बुधवारी देशव्यापी विरोधी दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. आयुध निर्माणी कर्मचार्यांची प्रलंबित एमसीएम ते चार्जमन प्रमोशनसाठी सरकारद्वारे एसआरओ -23 हा 21 मे 2023 लागू करण्यासाठी दिरंगाई होत आहे. तात्काळ स्वरूपात लागू करण्यासाठी आयुध निर्माणी बोर्ड कोलकत्ता व संरक्षण मंत्रालयाच्या डीओपीटी विभागाचा कर्मचार्यांनी विरोध दर्शवला. विरोधात कर्मचार्यांनी काळे बिल्ले लावून कामावर हजर झाले. एमसीएम ते चार्जमन 100% प्रमोशन सुप्रीम कोर्ट आदेशाचे पालन करून अवविलंब आदेश पारित करण्यासाठीची मागणी यावेळी करण्यात आली.
सकाळी मुख्य गेटवर कामगार युनियन पदाधिकारी व सभासदांनी कर्मचार्यांना कामावर जाते वेळी काळे फिते लावले व विरोध दिवस पाळण्याचे आवाहन केले, यास कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यांनी केले सहकार्य
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी युनियनचे किशोर बढे, गजानन इंगळे, प्रवीण मोरे, योगेश आंबोडकर, मिलेश देवराळे, संतोष बाविस्कर, दीपक भिडे, मिलिंद ठोंबरे, राजेंद्र तडवी, मोहन सपकाळे, संजय लोखंडे, महेंद्र पाटील, बिस्मिल्ला तडवी, स्वप्निल वराडे, शैलेश पवार, इजाज खान यांच्यासह सर्व पदाधिकारी सभासदांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
