भुसावळात तापमानात काही अंशी घसरण : आर्द्रतेमुळे उकाडा मात्र वाढला


भुसावळ (1 जून 2026) : शहराच्या कमाल तापमानात सोमवारी अल्प प्रमाणात घसरण होऊन पारा 41.3 अंशांवर पोहोचला. शहराच्या तापमानात गेल्या तीन दिवसांपासून सलग घसरण होत असली तरी उन्हाचे चटके कायम आहे. दरम्यान, 50 टक्यांपेक्षा अधिक आर्द्रता असल्याने उकाड्याचा त्रास मात्र वाढला आहे. आगामी आठवडाभर हीच स्थिती कायम राहू शकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शहरात 23 मे रोजी तापमानाचा पारा 43.3 अंशांवर होता. यानंतर तापमानात सातत्याने घट होत गेली. यानंतर पुन्हा 27 मे रोजी 43 अंशांवर तापमान गेले. मात्र 28 मे रोजी 42.8, 29 रोजी 41.9 अंशांवर पारा स्थिर राहिला तर शनिवारी यात पुन्हा घसरण होऊन पारा 41.3 अंशावर आला. तापमानात सातत्याने घसरण होत असली तरी उकाड्याचे प्रमाण मात्र कायम आहे.

आगामी आठवड्याभर आर्द्रतेमध्ये वाढ होऊन कमाल तापमानाचा पारा घसरणार आहे. उन्हाचे चटके कमी होणार असले तरी उकाड्याचे प्रमाण मात्र वाढेल. यासोबतच रात्रीचे किमान तापमानही 28 अंशांच्या वर राहू शकेल. सध्या सापेक्ष आर्द्रतेमध्ये झालेल्या वाढीमुळे भुसावळकरांना घामाच्या धारांची अनुभूती होत आहे. प्री मान्सून हालचालींमुळे ही स्थिती निर्माण झाली असून जोपर्यंत दमदार पाऊस होत नाही, तोपर्यंत उकाड्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात कायम राहिल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !