भुसावळातील ‘करीयर स्पेक्ट्रा अॅकेडमी’तील चार विद्यार्थ्यांची आयआयटीसाठी निवड
यशाची परंपरा कायम : अनुभवी शिक्षक वर्गासह सर्व सोयींनी युक्त क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन
Four students from ‘Career Spectra Academy’ in Bhusawal selected for IIT. भुसावळ (2 जून 2026) : भुसावळातील सेंट अलॉयसीस विद्यालयामागील ‘करीयर स्पेक्ट्रा अॅकेडमी’ भुसावळच नव्हे तर संपूर्ण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे. अलीकडेच या अॅकेडतील चार विद्यार्थी आयआयटी अॅडव्हान्ससाठी क्वॉलिफाय ठरले आहेत. या अॅकेडमीतील विद्यार्थ्यांनी नेहमीच यशाची परंपरा कायम राखत क्लासेसचा नावलौकीक वाढवला आहे.
चार विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश : आयआयटी अॅडव्हान्ससाठी क्वॉलिफाय
करीअर स्पेक्ट्रा अॅकेडमीत शिक्षण घेणार्या भुसावळातील रेहान अंजनी आर्यन, निशांत अभय कुमार, धु्रव महेश पवार व के.नारखेडे विद्यालयातील यज्ञेश दीपक विसपुते हे चौघे आयआयटी अॅडव्हान्ससाठी क्वालिफाय ठरले आहेत. या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोबत क्लासेसचा नावलौकीकही या विद्यार्थ्यांनी वाढवला आहे.
सर्व सुविधांनी युक्त क्लासेस
भुसावळातील सेंट अलॉयसीस शाळेमागील करीअर स्पेक्ट्रा क्लासेस भुसावळच नव्हे तर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. या क्लासेसमध्ये उच्चशिक्षीत प्रशिक्षित शिक्षक वर्ग, सर्व सोयी-सुविधांयुक्त क्लासेस तसेच प्रशस्त लायब्ररीची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आता बाहेरगावी जावून जेईई, नीट, एमएचटी-सीईटी तसेच फाउंडेशनचे महागडे कोर्सेस करण्याची आवश्यकता नाही कारण सर्व सुविधा आता स्थानिक भुसावळातच उपलब्ध झाल्या आहेत. या शिवाय क्लासेसमध्ये नियमित सराव चाचणी घेतली जाते तसेच विद्यार्थ्यांसाठी कॅन्टीन सुविधा उपलब्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे येथे वैयक्तिकरित्या लक्ष दिले जाते.
दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 टक्के सवलत
करीअर स्पेक्ट्रा अॅकेडमीत दरवर्षी आर्थिक व परीक्षेच्या निकषावर दहा विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 टक्के सवलत दिली जाते, असे क्लासेसचे संचालक व्ही.सी.सर म्हणाले.
सात वर्षांपूर्वी क्लासेसची स्थापना
भुसावळातील अजय राका व व्ही.सी.सर यांनी 2019 च्या सुमारास शहरात करीअर अॅकेडमीची स्थापना केली व पाहता-पाहता रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. व्ही.सी.सर म्हणाले की, पूर्वी पालकांना परजिल्ह्यात जेईई व नीटसाठी विद्यार्थ्यांना महागडे क्लासेस करून रूम करून द्यावे लागत होते मात्र आता स्थानिक स्तरावरच विद्यार्थ्यांना सर्व सुविधायुक्त क्लासेस शहरात उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आजच एकवेळ क्लासला भेट द्यावी, असे आवाहनही व्ही.सी.सर यांनी यावेळी केले.



