चिखली-तरसोद महामार्गावर अपघात : नहींच्या 1033 रुग्णवाहिकेची अपघातस्थळी तत्पर मदत
भुसावळ (6 जून 2026) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील चिखली-तरसोद प्रकल्प मार्गावरील हिरा मारोती मंदिर, मोहम्मद पुरा नाल्याजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्याने दुचाकीवरील एकाच कुटूंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला होता. सर्व मयत वरणगावजवळील कपिल वस्तीनगरातील रहिवासी असून अपघाताची माहिती कळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नहीं) च्या 1033 रुग्णवाहिका पथकाने तातडीने जबाबदारीचे भान राखत घेतली. अत्यवस्थ अवस्थेतील जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
एकाच कुटूंबातील चौघे ठार
या अपघातात विजय शंकर काळे (30), ऐश्वर्या बहादुर भोसले (50) व विघ्नेश शंकर चव्हाण (14) व मोनालिसा शंकर चव्हाण (1, सर्व रा.कपिल वस्तीनगर, भुसावळ) या बहिण-भावंडांचा मृत्यू ओढवला. कुटूंबातील चिमुकलीला बरे नसल्याने तिला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेत असताना बेपर्वा व विरुद्ध दिशेने आलेल्या वाहन चालकाने उडवल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
‘नहीं’ची रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध
चिखली-तरसोद प्रकल्पाचे कन्सेशनायर मे.एनएक्सटी इंफ्रा सिटी हायवेज प्रा.लि. यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (नहीं) 1033 रुग्णवाहिका सेवा 24 तास प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत अशा सेवा केवळ बचावकार्याला गती देत नाहीत, तर महामार्गावरील प्रवाशांमध्ये सुरक्षितता आणि विश्वासाची भावना अधिक दृढ करतात. राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षित आणि सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी नहींची 1033 रुग्णवाहिका सेवा सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. अपघात समयी 1033 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेची तातडीने उपलब्धता होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.



