रक्तदान चळवळीतील उल्लेखनीय कार्याबद्दल खडका येथील सतीश महाजन यांचा गौरव


Satish Mahajan from Khadka felicitated for his remarkable work in the blood donation movement. भुसावळ (11 जून 2026) :  रक्तदान क्षेत्रात सातत्याने समाजोपयोगी कार्य करून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देणारे रक्तदूत सतीश घनश्याम महाजन यांना कर्मयोगी वासुदेव गुरुजी संघटक गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भुसाळातील आपले परिवार सार्वजनिक वाचनालय आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुणे विभागाचे डेप्युटी सीओ तुषार सुधाकर येवले यांच्याहस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार एकनाथराव खडसे होते. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आमदार अमोल जावळे, गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलेजा नारखेडे, के.नारखेडे विद्यालयाचे सचिव पी.व्ही.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक कार्याला पुरस्कार ठरेल प्रेरणादायी
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सतीश महाजन यांनी आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाने आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून सुरू असलेल्या सामाजिक कार्याला हा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, हा सन्मान मिळाल्याबद्दल ु जीवनदान ब्लड ग्रुप, ग्रामीण भुसावळ, फैजपूर आणि जळगाव येथील सर्व सभासदांसह अनेक मान्यवरांनी सतीश महाजन यांचे अभिनंदन केले. रक्तदान जनजागृती आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश समाजात रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या सतीश महाजन यांच्या या सन्मानामुळे रक्तदान चळवळीला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !