यावल-भुसावळ रस्त्यावर पाटचारीजवळ ट्रक उलटला : दोघे किरकोळ जखमी
यावल (17 जून 2026) : यावल शहरातून भुसावळकडे जाणार्या रस्त्यावर पाटचारीजवळ मंगळवारी सायंकाळी दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातामध्ये ट्रक चालक आणि क्लिनर हे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
काय घडले यावल शहरात ?
शहरातून भुसावळ जाणार्या रस्त्यावर हतनूर धरणाची पाटचारीच्या पलीकडे भुसावळकडून यावलकडे ट्रक (क्रमांक जी. जे. 03 बी.व्ही. 0027) घेऊन चालक यावलकडे येत असताना अचानक दुचाकी चालक त्यांच्या समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने ट्रक अचानक वळवला. यात ट्रक अनियंत्रीत होत रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातामध्ये ट्रक चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात सुदैवाने कोणालाही काही मोठी दुखापत झाली नाही.




