भुसावळात उद्या ‘लेवा स्वररत्न’ स्पर्धेचे आयोजन

भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन


भुसावळ (20 जून 2026) : लेवापाटील समाजातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे व नवोदित गायकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे भव्य ‘कराओके स्वररत्न स्पर्धा 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रभाकर हॉलमध्ये रविवारी सायंकाळी पाच ते दहा वेळेत ही स्पर्धा होईल. या स्पर्धेसाठी 24 स्पर्धकांची निवड झाली आहे. सोलो व ड्यूएट अशा दोन गटांमधे ही स्पर्धा होईल.

यांची असेल उपस्थिती
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास कुटूंब नायक ललितदादा चौधरी, शाखाप्रमुख सुहासदादा चौधरी, सचिव व कार्यक्रम प्रमुख सुभाषचंद्र भंगाळे यांच्यासह समाजातील मान्यवरांची उपस्थिती असेल. समाजबांधवांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, शाखा भुसावळतर्फे करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !