भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात योग दिवस उत्साहात


भुसावळ (21 जून 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस रविवार, 21 जून रोजी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ.सुधीर शर्मा यांनी विविध आसने. सूर्यनमस्कार, प्राणायाम व ध्यानधारणा कशा पद्धतीने करावी याचे प्रशिक्षण सर्व प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना दिले. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी याप्रसंगी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी दररोज आपल्या दैनंदिन जीवनात अर्धा तास योग, प्राणायाम आणि सूर्य नमस्कार केलेच पाहिजे असे आवाहन केले.

भारतीय संस्कृतीत योग साधनेचे अत्यंत महत्त्व असून निरोगी आयुष्यासाठी योगासने सर्वांनी केलीच पाहिजे, असे मत प्राचार्यांनी व्यक्त केले. डॉ.विवेक जोशी. प्रा.हितेश गुप्ता, प्रा.ज्योती ओस्तवाल, कोमल भट आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. सुधीर शर्मा आपल्या दैनंदिन जीवनात दररोज योगासने केल्याने जीवनशैली उत्तम राहते, असे आपले मत व्यक्त केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !