निधन वार्ता : जिजाबाई संतोषसिंग परदेशी
बांबरुड प्र.ब.॥, ता.भडगाव (21 जून 2026) : भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र. ब. येथील रहिवासी जिजाबाई संतोषसिंग परदेशी (87) यांचे 17 रोजी सकाळी 9.45 वाजता वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परीवार आहे.
त्या डॉ.राजेंद्रसिंग परदेशी (संभाजीनगर) व प्रा.डॉ.करुणा परदेशी (पुणे), पुणे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सचे अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्या मातोश्री होत.




