भुसावळात ढगाळ वातावरणाने कमाल तापमान घसरले : उकाड्याने भुसावळकर घामाघूम


भुसावळ (23 जून 2026) : भुसावळ शहरात सोमवारी सकाळी तुरळक पावसाने हजेरी लावली. नंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळपर्यंत सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावली नाही. यामुळे तापमान घसरले. पण वातावरणात 60 टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असल्याने उकाड्याचे प्रमाण वाढले.

दिवसभर उन-सावलीचा खेळ
भुसावळ शहर व तालुक्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण राहण्याचे प्रमाण अधिक आहे. या काळात पावसाने एकवेळाही हजेरी लावली नाही. सोमवारी सकाळी मात्र पहिल्यांदाच शहरात पावसाचा शिडकावा झाला. नंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व उनसावलीचा खेळ सुरू असल्याने तापमान घसरले.

भुसावळसह विभागात 24 जून नंतरच दमदार पाऊस होऊ शकेल. सोमवारी पहिला तुरळक पाऊस झाला. किमान 80 ते 100 मिमी पाऊस होईपर्यंत शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे नजरा आकाशाकडे आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !