मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर यावलचा आठवडे बाजार उद्या राहणार बंद !


जळगाव (25 जून 2026) : मुस्लिम बांधवांचा मोहरम सण शुक्रवार, 26 जून 2026 रोजी असल्याने यावल शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच त्याच दिवशी नियमित आठवडे बाजार भरत असल्याने सार्वजनिक शांतता, सुरक्षितता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आली आहे.

आठवडे बाजार रद्द
मोहरम सणानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून 26 जून रोजी शुक्रवार असल्यामुळे नियमित आठवडे बाजारासाठी देखील नागरिक व व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. परिणामी शहरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



ही बाब विचारात घेऊन जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अ‍ॅण्ड फेअर्स अधिनियम, 1862 मधील कलम 5 (अ) व (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक 26 जून 2026 रोजी यावल शहरात भरण्यात येणारा नियमित आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

तसेच नागरिक व व्यापार्‍यांच्या सोयीचा विचार करून सदर आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !