गिरडगाव शेत शिवारात आढळलेल्या अजगराला सर्प मित्राकडून जीवदान
यावल (3 जुलै 2026) : यावल तालुक्यातील गिरडगाव येथील शेत शिवारात एक भला मोठा अजगर शेतकर्यास दिसला. शेतकर्यांने अजगराला दुखापत न करता चिंचोली येथील सर्प मित्रांना माहिती दिली व सर्प मित्रांनी शेतात येत अजगराला पकडत सातपुड्याच्या वनराईत सोडून त्यास जीवदान दिले.
सर्पमित्रांकडून अजगराला जीवदान
गिरडगाव, ता.यावल येथील शेतकरी नजीर नबाब तडवी यांच्या शेतात भला मोठा अजगर त्यांना दिसला. त्यांनी कुठलीचं दुखापत न करता तत्काळ चिंचोली येथील सर्प मित्रांना माहिती कळवली. सर्प मित्र अरुण कोळी, ज्ञानेश्वर मिस्तरी, भैया कोळी, योगेश पाटील, दीपक पाटील, मुस्तफा तडवी हे शेतात दाखल झाले व या सर्प मित्रांनी अजगरला चार तासाच्या परिश्रमानंतर सुरक्षीत पकडले व नंतर त्याला सातपुड्याच्या जंगलात नेत सुरक्षित सोडले.

पावसाळा सुरू झाला असून शेत-शिवारात बिळांमध्ये पाणी शिरल्यावर साप बाहेर निघतात. शेतकर्यांनी सापांना मारू नर्य, सर्प मित्रांना माहिती द्यावी, असे आवाहन सर्प मित्रांनी केले आहे.
