विश्व शांतीसाठी दर सोमवारी भुसावळातील जैन बांधवांच्या घरी जपाचा कार्यक्रम
भुसावळ (4 जुलै 2026) : जगात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी जैन समाजाच्या वतीने दर सोमवारी विश्व शांती जप कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रत्येक जैन बांधवाच्या घरी अखंडपणे सुरू असलेला हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. याच शृंखलेत, सोमवार 6 जुलै रोजी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत विशेष जप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम प्रोफेसर कॉलनीतील रामेश्वर नगरातील रहिवासी आणि प्रसिद्ध समाजसेवक गौतम इंदचंदजी चोरडिया यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या मंगल प्रसंगी जैन समाजातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जपाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीसंघाच्या वतीने करण्यात आले आहे. हे जाहीर आवाहन संघपती जयंतीलाल सुराणा, जे.बी.कोटेचा, अतुल ताथेड, कांतीलाल चोरडिया आणि विनोद मेहता यांनी केले आहे.

