भुसावळात 7 जुलै पासून प्रभू श्रीराम कथेचे आयोजन
जयपूरचे पं.मदन मोहनजी महाराज करणार रसाळ निरूपण
भुसावळ (4 जुलै 2026) : शहरातील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रभू श्रीराम कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, 7 जुलै ते सोमवार, 13 जुलै दरम्यान ही कथा पार पडेल. जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध पंडित (पुण्यवास) मदन मोहनजी महाराज आपल्या रसाळ वाणीतून दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत श्रीराम कथेचे वाचन व निरूपण करतील.
देशभरात पाचशेहून अधिक कथा
पं. पू. महाराजांनी संपूर्ण भारतभरात 500 हून अधिक श्रीराम कथांच्या माध्यमातून महान जनजागृतीचे कार्य केले आहे. श्रीराम कथेसोबतच भागवत कथा, शिवमहापुराण आणि गीता ग्रंथावर त्यांची मोठी पकड आहे. भुसावळात होणार्या या कथेचे प्रमुख यजमान वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे आहेत. या महान धार्मिक उत्सवाचे आयोजन श्री लक्ष्मी व्यंकटेश ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

असा असेल कथेचा कार्यक्रम
मंगळवार, 7 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता श्रीराम मंदिरापासून श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानपर्यंत कलश यात्रा निघेल. त्यानंतर कथा महात्म्य व बुधवारी सतीमोह प्रसंग-शिवपार्वती विवाह होईल.
गुरुवार. 8 जुलै रोजी नारद मोह आणि राम जन्मोत्सव सोहळा तर शुक्रवार, 9 जुलै रोजी श्रीराम जानकी विवाहोत्सव होईल. शनिवार, 10 जुलैला श्रीराम वनवास, केवट प्रसंग आणि भरत चरित्र तर रविवार, 11 जुलैला श्री हनुमान चरित्र आणि लंका कांड व सोमवार, 12 जुलैला सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान विशेष वेळेत रामराज्याभिषेक सोहळा, विश्राम हवन व प्रसादी वाटप होईल. या धार्मिक महोत्सवाचा सर्व भाविकांनी जास्तीत-जास्त संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन श्री राधाकृष्ण प्रभात फेरी मित्र मंडळ, सकल हिंदू समाज भुसावळ तसेच राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल आणि जे.बी.कोटेचा यांनी केले आहे.
