भुसावळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


भुसावळ (4 जुलै 2026) : एससी एसटी ओबीसी अँड मायनॉरिटीज असोसिएशन, आयुध निर्माणी भुसावळतर्फे आर्थिकदृष्टया दुर्बल व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम शनिवारी ज्युनिअर क्लब, आयुध निर्माणी, भुसावळ येथे उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी आयुध निर्माणी भुसावळचे कार्यकारी निर्देशक निरंजन लाल होते.

असोसिएशनचे अध्यक्ष तथा चीफ पॅट्रन यांनी कार्यकारी निर्देशक निरंजन लाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात असोसिएशनचे महासचिव राजकिरण निकम यांनी संस्थेने आजपर्यंत राबविलेल्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅग, नोटबुक संच, कंपास आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात कार्यकारी निर्देशक निरंजन लाल यांनी असोसिएशनच्या सामाजिक बांधिलकीचे व शैक्षणिक प्रोत्साहनपर उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळत असून सामाजिक विकासाला चालना मिळते, असे ते म्हणाले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास संयुक्त महाप्रबंधक अभय गोगटे, कार्यवेक्षक सुनील बाविस्कर, असोसिएशनचे अध्यक्ष नितेश तायडे, विनोद तायडे, सूर्यभान गाढे, महेंद्र तायडे, चंदू पिवाल, शैलेश पवार, संदीप सोनवणे, टोनी बरनार्ड, रामपाल वाल्मिकी, किशोर गोगी, मनोज प्रजापती, पंकज पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सूर्यभान गाढे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !