बोराळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पितांबर चौधरी


यावल (5 जुलै 2026) : यावल तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पितांबर रामदास चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात शांततेत पार पडली.

यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यमान सरपंच संध्याबाई उज्जैनसिंग राजपूत, मावळत्या उपसरपंच मायाबाई कैलासिंग राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य गौतमाबाई भीमराव वानखेडे, भरतसिंग साजनसिंग राजपूत, दीपाली खिलचंद चौधरी उपस्थित होते. निवड प्रक्रियेसाठी ग्रामसेवक अनिकेत बिर्‍हाडे यांनी कामकाज पार पाडले. यावेळी अमर वानखेडे यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !