श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे गुणवंतांचा 12 रोजी जळगावात सन्मान
भुसावळ (7 जुलै 2026) : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या समाजबांधवाचा सत्कार सोहळा रविवार, 12 जुलै 2026 रोजी जळगावात करण्यात येणार आहे.
गुणवंतांना आवाहन
दहावी, बारावी तसेच डिप्लोमा, डिग्री, शासकीय सेवेत समाविष्ट झालेले तसेच विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाजबांधवांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. जळगावातील सुदर्शन पॅलेस, पाचोरा रोड, कृष्णा लॉनसमोर सकाळी 10 वाजता कार्यक्रमास सुरूवात होईल. समाजबांवांनी तत्काळ आपले प्रमाणपत्र व विशेष प्राविण्य मिळवलेल्यांनी प्रमाणपत्र 8 जुलै तारखेपर्यंत जमा करावे, असे बैठकीत करण्यात आले.

राजपूत समाजासाठी सेवाकार्य करणारे व्यक्तिमत्व व राजकीय क्षेत्रात विशेष कामगिरी करीत असलेल्या समाजबांधव यांचाही समाजभूषण म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. बैठकप्रसंगी करणी सेनेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, खान्देश अध्यक्ष विलाससिंह पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) संदीप राणा राजपूत, जिल्हाध्यक्ष (शहरी) किरण राजपूत, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलसिंग मोरे, साई मल्टी सर्विसेसचे बी.एच.खंडाळकर, प्रवीण सपकाळे, संजय माळी, अजय राजपूत, आशिष राजपूत, गजानन राजपूत, विकास राजपूत, अभिजीत राजपूत, रोशन राजपूत, वैभव मोरे व समाजबांधव उपस्थित होते.