यावल पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिन उत्साहात


यावल (8 जुलै 2026) : शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात कृषी विभागामार्फत माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी नारायण चौधरी होते.

यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, तालुका कृषी अधिकारी भरत वारे तसेच कृषी सहाय्यक व इतर अधिकारी उपस्थित होते. कृषी दिनाच्या कार्यक्रम शेतकरी-केंद्रित होता व येथे शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, नैसर्गिक शेती, पीक व्यवस्थापन, हवामान बदल, पीक विमा आणि कृषीविषयक माहिती देण्यात आली. प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी तर आभार पंचायत समितीचे कृषी अधिकारी ई.के.चौधरी यांनी मानले.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीतेकरिता पंचायत समिती कृषी विभागाचे कृषी विस्तार अधिकारी गोकुळ सोनवणे, आर.ई.विसावळे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.बी.भदाणे, किशोर सपकाळे यांनी परिश्रम घेतले. दरम्यान कार्यक्रमाच्या समारोपानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध जातीच्या वृक्षांचे पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी पंचायत समितीच्या कृषी विभागाने घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !