प्रवाशांना मोठा दिलासा ः उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस आता दररोज धावणार !


भुसावळ (8 जुलै 2026) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोयी-सुविधांचा विचार करून गाडी क्रमांक 19021/19022 उधना – ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस त्री साप्ताहिक ऐवजी दररोज चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवार. 9 जुलै 2026 पासून होणार आहे. ही गाडी आता त्री साप्ताहिक ऐवजी दररोज धावणार आहे.

असे आहे वेळापत्रक
गाडी क्रमांक 19021 उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस उधना येथून गुरुवार, 9 पासून दररोज धावेल.

गाडी क्रमांक 19022 ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस ब्रह्मपूर येथून शुक्रवार, 10 पासून दररोज धावेल.

या स्थानकावर गाडीला थांबे
बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेड़ा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांटाबांजी, टिटलागढ़, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, पार्वतीपुरम, बोबबलि, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड आणि पलसा.

या गाडीला 11 सामान्य श्रेणी कोच, आठ स्लीपर श्रेणी कोच, एक पॅन्ट्री कार, दोन दिव्यांगजन/लगेज व गार्ड युक्त कोच असेल.

प्रवाशांनी या गाडीच्या धावण्याच्या दिवसांतील बदलाची नोंद घ्यावी व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !