भुसावळात जीएनआरएफतर्फे वृक्षारोपण मोहिमेला सुरूवात

पर्यावरण संवर्धनाचा संदेश : उस्मानिया मशिदीत उपक्रम


भुसावळ (10 जुलै 2026) : बदलते हवामान, सातत्याने वाढणारे तापमान आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेऊन दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक विभाग जीएनआरएफ (गरीब नवाज वेल्फेअर फाउंडेशन) तर्फे दरवर्षी 1 ते 15 जुलै या कालावधीत देशव्यापी विशेष वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येते.

याच मोहिमेच्या अनुषंगाने भुसावळातील मुस्लिम कॉलनी परिसरातील उस्मानिया मशिदीत वृक्षारोपण कार्यक्रम भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याहस्ते झाले. यावेळी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

याप्रसंगी दावत-ए-इस्लामी इंडिया, जळगाव जिल्हाध्यक्ष झुबैर अत्तारी यांनी सांगितले की, जीएनआरएफ चे यंदाचे उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्यात किमान एाक हजार 200 झाडांची लागवड करण्याचे आहे. त्यांनी नागरिकांना या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे, अधिकाधिक झाडे लावण्याचे आणि त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले, जेणेकरून भावी पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण मिळू शकेल.

यशस्वीतेसाठी शोएब अत्तारी, साबीर इकबाल, जहांगीर शेख, अब्दुल सईद, मतीन इंजिनिअर, फरीद शेख, युसुफ खान, जोएब शेख, आबिद मदनी, हाजी तनवीर, साबीर मेंबर, खालिद अत्तारी, हाफिज कासिम तसेच जीएनआरएफचे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन यांनी विशेष सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !