दीपनगरातील संच क्रमांक पाच देखभाल दुरुस्तीसाठी 35 दिवस बंद
भुसावळ (11 जुलै 2026) : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 500 मेगामॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक पाचच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने हा संच आगामी 35 दिवसांसाठी बंद राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही देखभाल दुरुस्ती करण्याचे नियोजन होते मात्र आता पावसाळ्यात विजेयी मागणी कमी झाल्याने प्रशासनाने हे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
संचाची होणार देखभाल दुरुस्ती
वीज निर्मिती संचातून सातत्य कायम रहावे, यासाठी वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असते. संच क्रमांक पाचच्या देखभाल दुरुस्तीचे काम ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते मात्र सध्या विजेची मागणी कमी असल्याने या काळात वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे. या कामासाठी हा संच किमान 25 दिवस बंद ठेवला जाणार आहे. सध्या दीपनगर औष्णिक केंद्रातील संच क्रमांक तीन, चार व सहा या तिन्ही संचातून सध्या मात्र विजेची निर्मिती केली जात आहे.
सयंत्रांची होणार डागडुजी
राज्यभरात झालेल्या पावसानंतर विजेच्या मागणीत घट झाली असून या काळात हे चार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले. देखभाल दुरुस्तीमध्ये बॉयलर, टर्बाइन्स आदींसह सर्व सयंत्रांची दुरुस्ती केली जाईल. यासोबतम इलेक्ट्रिकल आदी कामे केली जातील. यामुळे वीज निर्मिती संचातून पूर्ण क्षमतेने विजेची निर्मिती करण्यास मदत होणार आहे.
