भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात पालक-शिक्षक सर्वसाधारण सभा
भुसावळ (रविवार, 12 जुलै 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्ष 2026–2027 ची पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा रविवारी अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील होते.
यांची होती उपस्थिती
प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांनी केले. सभेच्या प्रारंभी विद्यालयाचे संगीत शिक्षक डी.एम.हेलोडे व एम.व्ही. कुलकर्णी यांच्यासह विद्यालयाच्या संगीत मंचच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, अॅड.पी.ई.नेमाडे, पालक-शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष भागवत रामचंद्र पाटील यांच्या स्वागत सत्कारानंतर पालक-शिक्षक संघाच्या नवीन उपाध्यक्षांची उपस्थित पालकांमधून सर्वानुमते निवड करण्यात आली. या संघाची इतर कार्यकारिणी सुद्धा पालकांमधून निवडण्यात आली.

विविध कोर्सेसची दिली माहिती
सभेत एस.पी.झांबरे व एस.एस.कापसे यांनी उपस्थित पालकांना विविध स्पर्धा परीक्षांंबाबत मार्गदर्शन केले तर विद्यालयात सुरू असलेल्या विविध संगणक कोर्सेसची माहिती संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील व संगणक शिक्षिका वंदना वारके यांनी दिली. संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील आणि मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांनी पालकांनी मांडलेल्या विविध शंकांचेही निरसन केले.
सभेचे अध्यक्ष पी.व्ही.पाटील यांनी पालक शिक्षक संघाच्या नियोजित अध्यक्षा अॅड.मुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल, नवीन निर्वाचित उपाध्यक्ष महेंद्र भंगाळे आणि संपूर्ण वर्गवार कार्यकारणीचे अभिनंदन केले. शिक्षण प्रक्रियेतील केंद्रबिंदू म्हणजेच विद्यार्थी याची प्रगती कशी साधता येईल याबाबत अध्यक्षीय भाषणातून पालकांशी हितगुज केले. उपशिक्षिका एन.एस.पाटील यांनी संघाच्या मागील वर्षाच्या अहवाल वाचनासह कार्यक्रम सूत्रबद्ध केला. पर्यवेक्षक एस.एल.राणे यांनी आभार मानले.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, एस.डी.वासकर, एम.व्ही.गरुडे, संगणक विभागासह संपूर्ण के.नारखेडे विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
