भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी साकारले ‘मानवी इंद्रधनुष्य’
भुसावळ (13 जुलै 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या पहिली ते चौथीच्या लहान विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे रेनकोट परिधान करून एक सुंदर ‘मानवी इंद्रधनुष्य’ साकारले. या उपक्रमात शाळेतील प्राथमिक विभागाच्या सुमारे 300 ते 400 विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिस्तबद्ध पद्धतीने इंद्रधनुष्याची प्रतिकृती तयार केली. रंगीबेरंगी रेनकोटमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मैदानाचा परिसर उजळून टाकला होता. या अनोख्या सादरीकरणा सोबतच विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सामूहिक नृत्यही सादर केले.
यांची होता सहभाग
शाळेच्या प्रिंसिपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना इंद्रधनुष्याविषयी (रंग आणि त्यांचे महत्त्व) सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमात प्रिन्सिपल नीना कटलर, व्हाईस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, अनिता कोळी, अनघा पाटील, हर्षला पाटील, मनीषा कीरंगे, अँनेट मॅथ्यू, आकाश परदेशी व विजय संकत व विद्यार्थी आदींनी सहभागी घेतला. लहान मुलांच्या या कल्पकतेचे आणि शिस्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

