सावदा शहरातील श्री स्वामीनारायण मंदिरात उद्या रथ यात्रा
सावदा (बुधवार, 15 जुलै 2026) : वडताल धाम अंतर्गत येणार्या श्री स्वामीनारायण मंदिराच्या वतीने गुरुवार, 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत दिव्य रथ यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
परम पूज्य धर्मधुरंधर 1008 आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज यांच्या शुभाशीर्वादाने तसेच सद्गुरु स्वामी श्री धर्मप्रसाददासजी यांच्या प्रेरणेने आणि शास्त्री स्वामी श्री भक्तिप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली या दिव्य रथ यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, समस्त सत्संग समाज व महिला मंडळ, सावदा यांच्या वतीने आयोजित या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा येथे होणार्या या दिव्य रथ यात्रा उत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
