भुसावळात 19 जुलै रोजी सम्यकदर्शनाजी महाराजांचे आगमन


भुसावळ (शुक्रवार, 17 जुलै 2026) : जैन गुरुमाई पूज्य सम्यकदर्शनाजी महाराज साहेब आदी ठाणे 3 यांचे दिनांक 19 जुलै रोजी रविवारी सकाळी भुसावळ शहरात मंगल आगमन होत आहे. या धार्मिक सोहळ्याची जैन भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

रविवार, 19 जुलै रोजी सकाळी आठ वाजता नाहाटा चौकापासून महाराज साहेबांचे मंगल प्रवेश होईल. त्यानंतर बालाजी गल्लीतील ओसवाल पंचायत भवनात त्यांचे आगमन होईल. नंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जपाचा कार्यक्रम आणि चातुर्मास प्रवेश
20 जुलै ते 22 जुलै दरम्यान दररोज सकाळी 8.45 ते 10.00 वाजेपर्यंत विश्वशांतीसाठी विशेष ‘जपाचा कार्यक्रम’ होणार आहे. यानंतर, गुरुवार, 23 जुलै रोजी गुरुवारी सकाळी 10.30 वाजता ‘चातुर्मासिक’ सुराणा साधना भवन (मातृभूमी चौक) येथे पूज्य महाराज साहेबांचा मंगल प्रवेश होईल.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा, प्रवचनाचा आणि दर्शनाचा लाभ भुसावळ व परिसरातील सर्व संघ बांधव, भगिनी आणि भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संघपती जयंतीलाल सुराणा, जे.बी.कोटेचा, गौतम चोरडिया, कांतीलाल चोरडिया, अतुल ताथेड, विनोद मेहता, विजय चोरडिया, विशाल चोरडिया व राजेश बाफना यांनी श्री संघाच्या वतीने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !