मोठे वाघोदा ग्रामस्थांनी केला नूतन आमदार नंदकिशोर महाजन यांचा सत्कार
आमदार उवाच : ग्रामस्थांनी गट-तट विसरून विकासासाठी एकत्र यावे
मोठे वाघोदा, ता.रावेर (रविवार, 19 जुलै 2026) : गावाच्या विकासासाठी गटतट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास जलद गतीने होतो तरी सर्वानी एकोप्याने यावे, असे आमदार नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केले. गावातील सर्व संस्था तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार नंदकिशोर महाजन, महंत दिवाकर शास्त्री, सरपंच अलकाबाई महाजन, डी.के महाजन, डॉ.भागवत भंगाळे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर पी.टी.महाजन, श्रावण महाजन, राजाराम पाटील, प्रकाश महाजन, डॉ.रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


आमदार नंदकिशोर महाजन यांचा सत्कार पाटील परिवाराच्या वतीने राहुल सुभाष पाटील, डॉ.रमेश पाटील, डॉ.अमोल पाटील किरण पाटील, आर.टी.पाटील, विनोद पाटील, सनी पाटील, सदानंद पाटील, विशाल पाटील, अतुल पाटील, निलेश पाटील यांनी तर चक्रधर शिक्षण मंडळाच्या वतीने चेअरमन डी.के.महाजन, सचिव किशोर पाटील, सहसचिव पी.एल.महाजन यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांनी केला.
जागृती पतसंस्थेतर्फे चेअरमन अनिल महाजन, संचालक किशोर पाटील, जीवन महाजन, फक्रुद्दीन तडवी ,विजयकुमार पाटील यांनी सत्कार केला.
ग्रामपंचायत वाघोदातर्फे लोकनियुक्त सरपंच अलकाबाई महाजन, उपसरपंच अजय तडवी, सदस्य संजय माळी, कालू मिस्तरी, महेंद्र काळे, प्रमिला भालेराव, अमीना तडवी यासह सर्व सदस्यांनी तर दूध उत्पादक संस्थेतर्फे चेअरमन पी.एल.महाजन संचालक यांनी केला. प्रकाश विद्यालयाच्या शिक्षक कर्मचार्यांतर्फे मुख्याध्यापक विजय महाजन, पर्यवेक्षक राजेश बडगुजर तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका कर्मचार्यांनी केला. गोपाल कृष्ण वाचनालयातर्फे जी.आर.महाजन आदींनी सत्कार केला.