\

मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने एकेरी विशेष गाड्या


भुसावळ (गुरुवार, 23 जुलै 2026) : मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मिरज ते नागपूर, नवी अमरावती आणि पंढरपूर ते भुसावळ मार्गांवर आषाढी एकादशी एकेरी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

मिरज ते नागपूर एकेरी विशेष गाडी
गाडी क्रमांक 01451 एकेरी विशेष 26 जुलैला मिरज येथून 12.55 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी नागपूर येथे 12.25 वाजता पोहोचेल. या गाडीला आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढाळगाव, जत रोड, म्हसबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी.

या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन असेल

मिरज ते नवी अमरावती एकेरी विशेष गाडी
गाडी क्रमांक 01453 एकेरी विशेष 26 जुलै रोजी मिरज येथून चार वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी नवी अमरावती येथे 12.50 वाजता पोहोचेल. या गाडीला आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढाळगाव, जत रोड, म्हसबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, नांदगांव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, आणि बडनेरा थांबा देण्यात आला आहे.

या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन असेल.

पंढरपूर ते भुसावळ एकेरी विशेष गाडी
गाडी क्रमांक 01459 विशेष दिनांक 27 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथून रात्री 10.30 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी भुसावळ येथे दुपारी एक वाजता पोहोचेल. या गाडीला कुर्डुवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा आणि जळगाव स्थानकावर थांबा असेल. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, 8 शयनयान, 8 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन असेल.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !