भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात
भुसावळ (गुरुवार, 23 जुलै 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय असंतोषाचे जनक, थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या निना कटलर यांच्याहस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टीळकांचा विचार प्रेरणा देणारा : प्राचार्य
प्राचार्य निना कटलर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. टिळकांचे विचार आणि त्यांनी दिलेला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हा नारा आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचे पालन करून जीवनात शिस्त, देशप्रेम आणि कठोर परिश्रम घेण्याची वृत्ती जोपासली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण परिसर ’लोकमान्य टिळक अमर रहे च्या घोषणांनी दणाणला. सूत्रसंचालन सोफिया पी.बॉडी तर आभार हर्षला चौधरी यांनी मानले.



