भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात


भुसावळ (शुक्रवार, 24 जुलै 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील उपस्थित होते. विद्यालयात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन चरित्र व कार्यावर प्रकाशझोत टाकला.

मुख्याध्यापिका अडकमोल यांनी विद्यार्थ्यांना दररोज इंग्रजीतून संभाषण करावे, लोकमान्य टिळकांचा करारीपणा, अंगी बाळगावा असा संदेश दिला. यशस्वीतेसाठी मनीषा सोनवणे व लीना चौधरी तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !