भुसावळातील आर.एस.आदर्श हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात
भुसावळ (शुक्रवार, 24 जुलै 2026) : शहरातील आर.एस.आदर्श हायस्कूलमध्ये गुरुवारी लोकमान्य टिळक जयंती तसेच वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा झाला.
प्रसंगी प्रायमरी व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ज्ञानवर्धक भाषणे झाली इयत्ता दहावीचा विद्यार्थी अथर्व श्रीराम पाटील याने लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत येऊन सर्वांचे लक्ष वेधले तसेच स्टुडन्ट ऑफ द इयरचे इयत्ता दहावीचा विद्यार्थी सक्षम गोविंदा दर्डा व इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुंजल राकेश भंगाळे हे मानकरी ठरले.
सूत्रसंचालन लविषा पिंजानी, मुस्कान आठवणी तर आभार गोसावी यांनी मानले. चेअरमन नंदलाल नागदेव, प्रायमरी चीफ प्रकाशलाल कृपलानी, सभासद मनीषकुमार सेवलानी, राजकुमार ठारवानी, प्रकाश हसराणी, शाळेचे मुख्याध्यापक वी.आर.मंगलाने व प्रायमरी मुख्याध्यापिका अय्यर उपस्थित होत्या. नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.



