‘माझा बीएलओ, माझा अभिमान’ : रात्रं-दिवस झटणार्‍या बीएलओंच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी डॉ.नितु पाटील यांचा पुढाकार


डॉ.नितु पाटील
वरणगाव (24 जुलै 2026) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आणि डशिलळरश्र खपींशपीर्ळींश ठर्शींळीळेप (डखठ) उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरातील बीएलओ आणि बीएलए-2 बांधव अत्यंत समर्पणाने रात्रंदिवस कार्यरत आहेत. दिवसभर घराघरात जाऊन मतदार पडताळणी, आवश्यक कागदपत्रांचे संकलन आणि रात्री उशिरापर्यंत ईएसआयनेटसारख्या डिजिटल प्रणालीवर माहिती अपलोड करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहेत. या सततच्या धावपळीमुळे आणि तासन्तास मोबाईल व संगणकाच्या स्क्रीनसमोर काम केल्यामुळे अनेक बीएलओ बांधवांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आणि ड्राय आय यासारख्या डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. ही समस्या लक्षात घेता डॉ.नितु पाटील यांनी कर्मचार्‍यांच्या डोळ्यांची तपासणी करीत त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली आहे.

अनेक कर्मचार्‍यांमध्ये खालील लक्षणे आढळून येत आहेत-
डोळे लाल होणे
डोळ्यांतून पाणी येणे
अंधुक किंवा दुहेरी दिसणे
डोळे दुखणे
डोळ्यांत जळजळ किंवा काहीतरी खुपल्यासारखे वाटणे
डोळे कोरडे पडणे

या समस्या केवळ कामाचा वेग कमी करत नाहीत तर दीर्घकालीन दृष्टीवरही परिणाम करू शकतात.

‘लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स’ ठरू शकतात प्रभावी उपाय
बीएलओ बांधवांच्या या आरोग्यविषयक अडचणीची दखल घेत वरणगावातील वासुदेव नेत्रालयाच्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.नितु पाटील यांनी संवेदनशील पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मते, मोबाईल आणि संगणकाचा अतिवापर झाल्यास डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. अशा परिस्थितीत वैद्यकीय सल्ल्यानुसार लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरल्यास डोळ्यांना आवश्यक ओलावा मिळतो, कोरडेपणा कमी होतो आणि डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते.

रात्रंदिवस स्क्रीनसमोर काम करणार्‍या प्रत्येक बीएलओने आपल्या नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य प्रकारचे आय ड्रॉप्स वापरावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्क्रीनवर काम करताना या गोष्टी आवर्जून पाळा

20-20-20 नियम
दर 20 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवून 20 फूट अंतरावरील वस्तूकडे किमान 20 सेकंद पाहा.

नियमित डोळ्यांची उघडझाप करा
स्क्रीनकडे सतत पाहताना डोळ्यांची उघडझाप कमी होते. त्यामुळे जाणीवपूर्वक वारंवार डोळे मिचकावत राहा.

ब्लू लाईटपासून संरक्षण
मोबाईलमध्ये ब्लू लाईट फिल्टर सुरू ठेवा किंवा अँटी-ग्लेअर चष्म्याचा वापर करा.

संकोच करू नका… मला फोन करा, भेटायला या
केवळ वैद्यकीय सल्ला देऊन न थांबता डॉ. नितु पाटील यांनी बीएलओ बांधवांना भावनिक आणि आपुलकीची हाक दिली आहे. माझे सर्व बीएलओ बांधव देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहेत. काम करताना डोळ्यांचा कोणताही त्रास जाणवत असेल, तर संकोच न बाळगता मला थेट फोन करा किंवा प्रत्यक्ष भेटा. तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करणे आणि गरजेनुसार आय ड्रॉप्स उपलब्ध करून देणे, यातच मला खरा आनंद मिळेल, असे डॉ.नितु पाटील म्हणाले.

‘माझा बीएलओ, माझा अभिमान’चा खरा अर्थ
माझा बीएलओ, माझा अभिमान’ हे केवळ घोषवाक्य न राहता, बीएलओ बांधवांच्या आरोग्याची कौटुंबिक जबाबदारी स्वीकारणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !