माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आदर्श लोकशिक्षक : प्रा.आशुतोष वर्डीकर
भालोद, ता.यावल (सोमवार, 27 जुलै 2026) : भारताचे माजी राष्ट्रपती तथा अणुऊर्जा संशोधक एपीजे अब्दुल कलाम हे समाजाला प्रबोधनाचा विचार सांगणारे आदर्श लोकशिक्षक असल्याचे विचार प्रा.आशुतोष वर्डीकर यांनी येथे व्यक्त केले. माजी राष्ट्रपती ब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद ला आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे, संस्थेचे संचालक गुणवंत पिंपळे उपस्थित होते. विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते.
राज्यशास्त्र विभागाच्या वतीने थोर शास्त्रज्ञ, राष्ट्रपती राहिलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांना सामूहिक ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली. या ग्रंथ वाचन कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह प्रा.डॉ.सुनील नेवे, प्रा.डॉ.जतीन मेढे, प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे आदी उपस्थित होते.